डॉ. स. गं. मालशे यांचे एक चुलते मालशे वैद्य कोकणातच चिपळूण-गुहागर रस्त्यावरील रामपूर या गावात स्थायिक झाले होते. त्यांच्या दोन मुलींनी, म्हणजे डॉ. मालशे यांच्या चुलत बहिणींनी, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या ह्रद्य आठवणी पाठवल्या आहेत.
पहिला व्हिडिओ उषा मालशे (लग्नानंतर माधवी जोशी), तर दुसरा शकुंतला मालशे (लग्नानंतर कल्पना पटवर्धन) यांचा आहे.
या दोघींची धाकटी बहीण पुष्पा हिचे पती श्री. दंडगे हे कोकणातील शाळांतच प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक झाले. त्यांच्या आठवणींचा तिसरा व्हिडिओ आहे.