डाॅ. स. गं. मालशे यांच्या ‘आगळं-वेगळं’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आलेली आहे!
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपली ऑर्डर नोंदवू शकता –

https://papyrusthebookstores.com/papyrus3/products/aagln-vegln


नमस्कार,

स न वि वि

सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 हे वर्ष प्रख्यात संशोधक समीक्षक डॉ स गं मालशे जन्मशताब्दी वर्ष आहे हे आपणास ज्ञात आहे . जन्मशताब्दी च्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिका जुलै – सप्टेंबर 2021 चा अंक डॉ स गं मालशे विशेषांक म्हणून प्रकाशित करीत आहे .

15 ऑगस्ट 2021 रोजी हा अंक प्रकाशित होईल . सोबत अंकाचा तपशील पाठवत आहे . आपण पत्रिकेचे वर्गणीदार नसल्यास आपली प्रत राखून ठेवा.

– प्रदीप कर्णिक

पत्ता : मराठी संशोधन मंडळ

172 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, दादर ( पूर्व )मुंबई 400014

संपर्क : शशिकांत भगत 9082316206

Prof. S. G. Malshe’s compendious doctoral study of Father Stephens’ ख्रिस्तपुराण is being made available in digital (pdf) form. This is for educational & academic purposes only. Any scholar making use of it will have the obligation of giving the reference of this website as the source.

डाॅ. स. गं. मालशे यांचा पी एच डी पदवीसाठी लिहिलेला फादर स्टीफन्स याच्या ख्रिस्तपुराणाचा भाषिक आणि वाङ्मयीन अभ्यास येथे pdf रूपात देत आहोत. केवळ शैक्षणिक हेतूने उपलब्ध करून दिलेले हे काम आहे. त्याचा वापर करणाऱ्या अभ्यासकांनी प्रस्तुत संकेतस्थळाचा संदर्भ देणे आवश्यक आहे.

प्रा. वसंत आबाजी डहाके (जन्म १९४२). मराठीतील आघाडीचे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक. चित्रकार.

मराठीतील ख्यातनाम कवी , कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी डॉ. स. गं. मालशे यांच्या गतशतक शोधिताना (१९८९) या ग्रंथाविषयी केलेले विवेचन.

अभिवाचन : मिलिंद मालशे

डॉ. प्रभा गणोरकर (जन्म १९४५). मराठीतील आघाडीच्या कवी आणि समीक्षक.

मराठीतील ख्यातनाम कवी आणि समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांनी डॉ. स. गं. मालशे यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी (१९८७) या ग्रंथाविषयी केलेले विवेचन.

अभिवाचन : चारुता मालशे

Dr. Annie Rachel Royson on Prof. S.G.Malshe

डॉ. अॅनी रेचल रॉयसन (Dr. Annie Rachel Royson) यांनी २०१८ मध्ये आय आय टी गांधीनगर या संस्थेतून पी एच डी पदवी प्राप्त केली (मार्गदर्शक डॉ. अर्नपूर्णा रथ). संशोधनाचा विषय :
Seventeenth Century Goa: Reading Cultural Translation, Sacredness, and Transformation in the Kristapurana of Thomas Stephens S.J.

सध्या त्या School of Liberal Studies, Pandit Deendayal Energy University, Gandhinagar, Gujarat येथे प्राध्यापक आहेत.

डॉ. स. गं. मालशे यांचे एक चुलते मालशे वैद्य कोकणातच चिपळूण-गुहागर रस्त्यावरील रामपूर या गावात स्थायिक झाले होते. त्यांच्या दोन मुलींनी, म्हणजे डॉ. मालशे यांच्या चुलत बहिणींनी, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या ह्रद्य आठवणी पाठवल्या आहेत.

पहिला व्हिडिओ उषा मालशे (लग्नानंतर माधवी जोशी), तर दुसरा शकुंतला मालशे (लग्नानंतर कल्पना पटवर्धन) यांचा आहे.

Smt. Madhavi Joshi on Prof. S.G.Malshe
Smt. Kalpana Patwardhan on Prof. S.G.Malshe

या दोघींची धाकटी बहीण पुष्पा हिचे पती श्री. दंडगे हे कोकणातील शाळांतच प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक झाले. त्यांच्या आठवणींचा तिसरा व्हिडिओ आहे.

Shri Vishwanath Dandge on Prof. S.G.Malshe